Sant Dnyaneshwar Shikshan Sanstha's

Hon. Shri. Annasaheb Dange Ayurved Medical College,
Post Graduate & Research Center, Ashta.

Tal-Walwa Dist- Sangli - 416 301(Maharashtra) India

Institute ID :- AYU0187

Accredited by NAAC with 'B+' Grade & ISO 9001:2015, 14001:2015

(Affiliated to National Commission for Indian System of Medicine, AYUSH, Govt. of India, New Delhi, Maharashtra University of Health Sciences.,Nashik, Maharashtra)

Hospital Scheme

 

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारतप्रधानमंत्री जन आरोग्य योजना (एकत्रित)

योजनेविषयी : महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना: महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना ही महाराष्ट्र शासनाची महत्त्वाकांक्षी आरोग्य विमा योजना आहे. योजनेंतर्गत निवडक आजारांवर शासकीय व खाजगी अंगीकृत रुग्णालयांच्या जाळयामार्फत पात्र शिधापत्रिकाधारक व अन्य लाभार्थी गटांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. ही योजना पूर्वी ‘राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजना’ या नावाने ओळखली जात होती व दि.2 जुलै,2012 पासून आठ जिल्हयांत लागू करण्यात आली होती. त्यांनतर दि.21 नोव्हेंबर,2013 पासून ही योजना महाराष्ट्रातील उर्वरीत 28 जिल्हयांमध्ये विस्तारीत करण्यात आली होती. दि. 14 डिसेंबर, 2020 रोजीच्या शासन निर्णयान्वये योजनेच्या नावात ‘महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना’ अशी अंशत: बदल करण्यात आलेले आहे. या योजनेंतर्गत राज्यातील 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांना नि:शुल्क वैद्यकीय सेवा पुरविण्यात येत आहेत. आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना: आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना ही भारत सरकारची आरोग्य विमा योजना असून दि.23 सप्टेंबर,2018 पासून राज्यात लागू करण्यात आली. सदर योजना राज्यात महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसोबत एकत्रितरित्या सुरु करण्यात आली. ही योजना विमा आणि हमी तत्त्वावर राबविण्यात येत असून एकत्रित योजनेंतर्गत समाविष्ट असलेल्या 2.22 कोटी लाभार्थी कुटुंबांपैकी सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना,2011 च्या यादीतील (SECC database) 83.63 लक्ष कुटुंबे या योजनेची लाभार्थी आहेत. दि.1.04.2020 पासून सुधारित एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना राज्यात राबविण्यात येत आहे. युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत एकत्रित योजनेतील गट-अ लाभार्थी कुटुंबांना 996 उपचारांकरिता प्रति कुटुंब प्रति वर्ष रु.1.5 लक्ष रकमेपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण विमा तत्त्वावर पुरविले जात आहे. गट-अ लाभार्थी कुटुंबांच्या वतीने राज्य आरोग्य हमी सोसायटी प्रति कुटुंब प्रति पॉलिसी वर्ष रु.797/- विमा रक्कम त्रैमासिक हप्त्यांमध्ये विमा कंपनीस अदा करीत आहे. राज्य आरोग्य हमी सोसायटी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील गट-ब व गट-क लाभार्थ्यांना हमी तत्त्वावर उपचार पुरवित आहे. त्याचप्रमाणे आयुष्मान भारत - प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत 996 उपचारांकरिता रु.1.5 लक्षापुढील ते रु.5 लक्ष रकमेपर्यंतचे व केवळ सदर योजनेत अंतर्भूत असलेल्या 213 उपचारांकरिता रु.5 लक्ष रकमेचे आरोग्य संरक्षण राज्य आरोग्य हमी सोसायटी हमी तत्त्वावर पुरवित आहे. कोविड-19 साथरोगाच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक आरोग्य विभागाकडील दि.23 मे, 2020 रोजीच्या शासन निर्णयानुसार महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना राज्यातील सर्व नागरिकांसाठी हमी तत्त्वावर विस्तारीत करण्यात आली होती. महाराष्ट्र शासनाने वेळोवेळी सदर योजनेस मुदतवाढ दिली होती तथापि सार्वजनिक आरोग्य विभागाकडील सूचनेनुसार दि.06.06.2022 पासून सदर विस्तारीत योजना स्थगित करण्यात आली आहे. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेसाठी महाराष्ट्र शासनाकडून संपुर्णत: निधी प्राप्त होत आहे तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेकरिता होणाऱ्या खर्चाची केंद्र व राज्य शासन यामध्ये 60:40 या प्रमाणात विभागणी करण्यात आली आहे.

विमा कंपनी:


सदर योजना दि.2.7.2012 ते दि.31.03.2020 या कालावधीमध्ये नॅशनल इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत होती. दि.1.04.2020 पासून एकत्रित महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत- प्रधानमंत्री जन आरोग्य योजना युनायटेड इंडिया इन्श्युरन्स कंपनी या सार्वजनिक क्षेत्रातील विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे.

लाभार्थी:
1) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी:

गट

लाभार्थ्यांचा तपशील

गट अ

महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्हयांमधील अन्न व नागरी पुरवठा विभाग, महाराष्ट्र शासन यांचेकडून वितरीत करण्यात आलेल्या पिवळी शिधापत्रिका, अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिका, अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व केशरी ‍ शिधापत्रिकाधारक कुटुंबे.

गट ब

अवर्षणग्रस्त 14 जिल्हयातील (औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड, उस्मानाबाद, अमरावती, अकोला, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ व वर्धा) शुभ्र शिधापत्रिकाधारक शेतकरी कुटुंबे

गट क

1. शासकीय अनाथाश्रमातील मुले, शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी, शासकीय महिला आश्रमातील महिला, शासकीय वृध्दाश्रमातील जेष्ठ नागरिक 2. माहिती व जनसंपर्क कार्यालयाकडील निकषानुसार पत्रकार व त्यांचेवर अवलंबित असलेले कुटुंबातील सदस्य. 3. महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदणी जिवित बांधकाम कामगार व त्यांची कुटुंबे

2) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेचे लाभार्थी: सामाजिक, आर्थिक व जा‍तनिहाय जनगणनेच्या वंचित व व्यावसायिक निकषानुसार अनुक्रमे ग्रामीण व शहरी क्षेत्रातील कुटुंबांचा या योजनेत समावेश करण्यात आला आहे.

क्षेत्र

लाभार्थ्यांचा तपशील

शहरी

शहरी भागातील खालील 11 व्यावसायिक गटातील कामगार योजनेसाठी पात्र आहेत.

  • · • कचरा वेचक
  • · • भिक्षुक
  • · • घरगुती कामगार
  • · • गटई कामगार/ मोची/फेरीवाले/रस्त्यावर सेवा पुरविणारे अन्य कामगार
  • · • बांधकाम कामगार/ प्लंबर/ गवंडी/कामगार/ रंगारी/ वेल्डर/सुरक्षा रक्षक/हमाल व डोक्याने भार वाहणारे अन्य कामगार
  • · • सफाईगार/स्वच्छक/ माळी
  • · • घरकाम करणारे/ हस्तकला कारागीर/शिंपी,
  • · • वाहतूक कर्मचारी/ चालक/ वाहक/ चालक व वाहकांचे मदतनीस/हातगाडी ओढणारे/सायकल रिक्षा ओढणारे
  • · • दुकानात काम करणारे/ सहाय्यक/ लहान आस्थापनांमधील शिपाई/ मदतनीस/ अटेण्डट/ वेटर
  • · • वीजतंत्री/ मेकॅनिक/ असेम्ब्ली / दुरुस्ती करणारे
  • · • धोबी व वॉचमन

ग्रामीण

ग्रामीण भागाच्या एकूण 7 वंचित निकषांपैकी, प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये खालील सहा वंचित निकषातील (D1 to D5 and D7) किमान एक निकषात बसणाऱ्या कुटुंबांचा व आपोआप समाविष्ट (बेघर, भिक्षुक, स्वच्छता कर्मी, निराधार कुटुंबे, मुलत: अनुसूचित जमाती व कायदेशीर बंधपत्रित कामगार) निकषांतील कुटुंबांचा समावेश होतो.

  • · • D1- कच्च्या भिंती व कच्च्या छताच्या एका खोलीत राहणारे कुटुंब
  • · • D2- 16-59 वयोगटातील प्रौढ सदस्य नसलेले कुटुंबे
  • · • D3- 16-59 वयोगटातील प्रौढ पुरुष सदस्य नसलेले कुटुंब
  • · • D4- दिव्यांग कुटुंब प्रमुख असलेली कुटुंबे
  • · • D5- अनुसूचित जाती व जमाती मधील कुटुंबे
  • · • D7- भूमिहीन मजूराची कुटुंबे

पात्रता आणि ओळख:1) महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेतील लाभार्थी:

गट

पात्रतेचे निकष

गट अ

सर्व पात्र लाभार्थ्यांची ओळख पिवळी, केशरी, अंत्योदय अन्न योजना व अन्नपूर्णा योजना शिधापत्रिका व त्यासोबत राज्य आरोग्य हमी सोसायटीने निश्चित केलेल्या फोटो ओळखपत्रांपैकी कोणतेही एक फोटो ओळखपत्र याव्दारे पटविली जाते.

गट ब

महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे / कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या 7/12 उताऱ्यासह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसुल अधिकाऱ्यांनी लाभार्थी/ शेतकरी कुटुंबांतील सदस्य हा शेतकरी असल्याचे नमुद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्याचे फोटो ओळखपत्र याव्दारे निश्चित केली जाते.

गट क

महाराष्ट्रातील अवर्षणग्रस्त 14 जिल्हयांतील शेतकऱ्यांची पात्रता लाभार्थ्यांचे / कुटुंब प्रमुखाचे नाव असलेल्या 7/12 उताऱ्यासह शुभ्र शिधापत्रिका किंवा नजीकच्या महसुल अधिकाऱ्यांनी लाभार्थी/ शेतकरी कुटुंबांतील सदस्य हा शेतकरी असल्याचे नमुद केलेले प्रमाणपत्र व लाभार्थ्याचे फोटो ओळखपत्र याव्दारे निश्चित केली जाते.

2) प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेतील लाभार्थी: सामाजिक, आर्थिक व जातनिहाय जनगणना,2011 मध्ये नोंदीत कुटुंबांतील सदस्य प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत अंगीकृत रुग्णालयात संगणकीकृत ई-कार्ड व फोटो ओळखपत्र दाखवून लाभ घेऊ शकतात. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेंतर्गत एका राज्यातील रुग्ण देशातील दुसऱ्या कोणत्याही राज्यातील अंगीकृत रुग्णालयांत जाऊन शस्त्रक्रिया/उपचारांचा लाभ घेऊ शकतो. आपले सरकार सेवा केंद्र व अंगीकृत रुग्णालयांमार्फत माहे ऑक्टोबर, 2022 अखेर  74,03,969 व्यक्तींना ई-कार्ड वाटप करण्यात आले आहे.

 

 

 

Specialties Empanelled: for Dhanvantari Hospital Ashta

 

 

Cardiology (M7)

 

Critical Care (M3)

 

 

GENERAL MEDICINE (M16)

 

General Surgery (S1)

 

 

Genitourinary System (S9)

 

Gynaecology And Obstetrics Surgery (S4)

 

 

Hematology (M18)

 

Infectious Diseases (M5)

 

 

Interventional Radiology (M15)

 

Nephrology (M8)

 

 

Ophthalmology Surgery (S3)

 

Orthopedic Surgery And Procedures (S5)

 

 

Poly Trauma (S14)

 

Surgical Oncology (S11)

 

 

माश्रीआण्णासाहेब डांगे आयुर्वेद मेडीकल कॉलेजधन्वंतरी धर्मादाय रुग्णालय आष्टा

मा. उच्च न्यायालय, मुंबई यांचे रिट याचिका क्र.३१३२/२००४ मधील दिनांक १७.०८.०६ चे आदेशाप्रमाणे अंमलात आणावयाची योजना

१). मुंबई सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० अन्वयेची सार्वजनिक न्यास म्हणून नोंद झाली आहे व जो धर्मदाय रुग्णाय चालवित आहे, वैद्यकिय मदत देणारे केंद्र आहे व ज्याचा वार्षिक खर्च हा पाच लाख रुपयापेक्षा जास्त आहे असे न्यास कलम ४१ अ अ च्या उप कलम (४) अंतर्गत शासकिय अनुदानित सार्वजनिक न्यास समजले जातील.

२). वरिल कलम १ अंतर्गत जे याबाबत त्यानी वैद्यकिय केंद्रात कार्यान्वीत असलेल्या खाटांच्या संखेपैकी एकून १० टक्के खाट गरिब रुग्नासाठी मोफत आरक्षित ठेवल्या जावून सदर उद्येशा करिताच राखून ठेवल्या जातात आणि दुर्बल घटकातील रुग्णांसाठी एकून कार्यन्वित असलेल्या खाटापैकी १० टक्के खाटा सवलतीच्या दरात आरक्षित ठेवल्या जातात.

३). धर्मदाय रुग्णालयांनी खाली नमुद सेवा मोफत गरीब व दुर्बल घटकांतील रुग्णांना दिल्या जातात- (१) खाटा (२) निवासी वैद्यकिय अधिकारी सेवा (३) शुश्रुषा (४) अन्न (जर पुरवित असाल तर) (५) कापड (६) पाणी (७) विज (८) नित्य निदान विषयक सेवा (९) इतर सर्वसामान्य सेवा.

४). ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न 1 ,80,000/. आत आहे अशा रुग्णांना गरीब रुग्ण संबोधले जाते. अशा रुग्णांना वैद्यकिय तपासणी व उपचार पूर्णपणे मोफत दिली जातात. औषध, उपयोगात आणलेल्या वस्तू व शरिराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार हा रुग्णालयाच्या खरेदिच्या किंमतीत लावण्यात येतो.

५). ज्या रुग्णाचे वार्षिक उत्पन्न 3,60,000 या आत आहे अशा रुग्णांना दुर्बल रुग्ण संबोधले जाते. अशा रुग्णांना वैद्यकिय तपासणी व उपचार सवलतीच्या दरात दिले जातात. औषध, उपयोगात आणलेल्या वस्तू व शरिराच्या आत लावलेल्या वस्तू यांचा आकार हा रुग्णालयाच्या खरेदिच्या किंमतीत लावण्यात येतो. मात्र सदर रुग्णास वस्तुंची ५० टक्के किंमत द्यावी लागेल.

६). संबधित रुग्णांनी उत्पन्नाच्या दाखल्यासाठी मा. तहसिलदार यांचा उत्पन्नाचा दाखला, पिवळी शिधा पत्रीका सादर करावी.

७). धर्मादाय रुग्णांनी सदर योजनेची अंमलबजावणी करण्यास नकार दिल्यास संबंधित रुग्णांनी मा. सहाय्यक धर्मादाय आयुक्त. सांगली विभाग, संगली. यांचेकडे लेखी तक्रार करावी.